Friday, July 5, 2024

मराठी कलाकारांच्या घरात झाली श्रींची स्थापना, फोटो शेअर करून दाखवली बाप्पाची झलक

गणेशोत्सव हा सर्वांच्या आवडीचा सण आहे. कुटुंबातील माणसे एकत्र जोडून ठेवण्याचे काम हा सण करतो. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चला तर आता आपण आपल्या लाडक्या कलाकारांच्या घरातील बाप्पाबद्दल जाणून घेऊया.

बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगताप हिच्या घरात श्रींचे आगमन झाले आहे. तिने तिच्या घरातील गणरायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने साडी नेसलेली दिसत आहे. तसेच घरातील बाप्पाचे डेकोरेशन देखील खूप सुंदर दिसत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील चिमुकली अभिनेत्री मायरा वैकुळ हिच्या घरी देखील बाप्पाचे विराजमान झाले आहे. तिने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मायरा तिच्या बाप्पासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मायरा खूप सुंदर दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कोठारे कुटुंबात देखील गणपतीचे आगमन झाले आहे. हे फोटो अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्मिलाने गणेशाची मूर्ती हातात घेतली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे प्रिया मराठे आणि शंतनु मोघे यांनी देखील त्यांच्या घरातील बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गणपतीची मूर्ती शाडूची दिसत आहे. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने बाप्पाची स्थापना केली आहे. फोटोमध्ये ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. पारंपारिक वेशात प्रियाचे सौंदर्य खुलले आहे.

सेलिब्रिटी कपल श्रुती मराठे आणि गौरव घाटनेकर यांच्या घरात गणरायाचे आगमन झाले आहे. श्रृतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बाप्पाचे फोटो आहेत केले आहेत. या फोटोमध्ये पाहू शकता की, त्यांनी पाना-फुलांनी बाप्पाची आरास केली आहे. तिने साडी नेसली आहे तर गौरवने कुर्ता घातला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील नवविवाहित जोडपे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांनी देखील बाप्पा सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मिताली आणि सिद्धार्थ दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. मिताली जांभळ्या रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, नाकात नथ असा सगळा साजशृंगार केला आहे. तर सिद्धार्थ देखील जांभळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे याने देखील त्याच्या घरातील गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने फुलांनी आणि केळीच्या पानांनी गणपतीचा देखावा केला आहे. फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.

शरद केळकर :
मराठीसोबतच बॉलिवूडदेखील गाजवणारा शरद त्याच्या भारदस्त आवाजामुळे आणि प्रभावी अभिनयामुळे ओळखला जातो. शरदने देखील मोठ्या दिमाखात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. शरदने त्याच्या गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्याने गुलाबी रंगाच्या फुलांची अतिशय सुंदर आणि आकर्षक आरास केली आहे. या फोटोंमध्ये पहिले तर त्याच्यासोबत त्याची पत्नी कीर्ती देखील आहे. दोघांच्या चेहऱ्यावर बाप्पा घरी आल्याचा एक वेगळाच आनंद दिसत आहे.

सर्वच कलाकार सद्य बाप्पाच्या सेवेत मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा