Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनयाबरोबर यशस्वी बिझनेस करणारे मराठी कलाकार

कितीही म्हटलं तरी अभिनय क्षेत्र, म्हणजे रिस्क तो है बॉस असंच आहे. कारण या क्षेत्रात यश मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा काही कलाकार अभिनयाबरोबरच वेगळा काहीतरी करण्याचा विचार करतात. काहींनी तर स्वत:चे व्यावसायही सुरु केले आहेत. मराठी इंडिस्ट्रितही असे कलाकार आहेत हा मित्रांनो. असं म्हटलं जातं की मराठी माणूस व्यावसायात जरा कच्चाच आहे, पण तरी या मराठी कलाकारांनी आपल्या व्यायसायातून आम्ही कुठे कमी नाही, हे दाखवून दिलंय, कोण आहेत ते कलाकार चला पाहू…

प्रिया बापटने आत्तापर्यंत आपल्या अभिनयाने गेली दोन दशके सर्वांना प्रभावित केले आहे. पण ती सुद्धा अभिनयाबरोबरच आपल्या बहिणीबरोबर व्यावसायही करते. तिने तिची बहिण श्वेता हिच्यासोबत मिळून साड्यांचा ब्रँड सुरू केला असून अनेकदा या याचे ब्रँडिंगही ती सोशल मीडियावरून करताना दिसते. तिच्या अनेक सोशल मीडियावर ती त्यांच्या बँडच्या साड्या घालूनही पोस्ट करत असते. त्यांच्या ब्रँडचं नाव सावेंची आहे.

तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्री चांगल्या मैत्रीणी देखील आहे. याच मैत्रीचे रुपांतर व्यावसायातील भागीदार म्हणूनही झाले. त्यांनी तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. यात पारंपारिक पेहरावाबरोबरच मॉर्डन आऊटफिट्सही दिसून येतात. अनेक कलाकारही त्यांच्या या ब्रँडचे प्रमोशन करताना दिसतात. या दोघीही अभिनयाबरोबर समतोल साधत हा व्यावसाय सांभाळत आहे.

९०-२००० च्या दशकात अनेक हिट मराठी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री निविदिता जोशी-सराफ या देखील चांगल्या व्यावसायिका आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी हंसगामिनी हा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. हा ब्रँडच्या साड्यांना चांगली मागणी असते. त्यांनी जेव्हा मुलाच्या जन्मानंतर अभिनयापासून काही काळ दूर गेल्यानंतर हा ब्रँड सुरू केला होता.

प्रिया मराठे आणि शांतनु मोघे की कलाकार जोडी मराठी सिनेसृष्टीत चर्चेत असते. विविध मालिका, सिनेमांमध्येही हे दोघे काम करतात. पण याबरोबरच त्यांनी व्यावसायातही पाऊल टाकले असून त्यांनी द बॉम्बे फ्राईज हे कॅफे ओपन केले आहे. सोशल मीडियावरही ते या कॅफेबद्दल पोस्ट करत असतात.

डबलसीट, टाईमपास, आम्ही दोघी अशा चित्रपटांमध्ये दिसलेली दिसलेली अभिनेत्री आरती वडगबाळकर ही सुद्धा एक चांगली व्यावसायिका आहे. तिचाही कपड्यांचा ब्रँड असून अनेक सेलिब्रेटी तिच्या या ब्रँडचे प्रमोशनही करत असतात. तिच्या ब्रँडचे नाव कलरछाप आहे.

अपूर्वा नेमळेकर ही रात्रीस खेळ चाले मालिकेतून चांगलीच नावारुपाला आली. तिने याव्यतिरिक्त अन्यही मालिकांमध्ये काम केले आहे. पण अभिनयाबरोबरच तिने ज्वेलरी कलेक्शनचा व्यावसाय सुरू केला आहे. तिने अपूर्वा कलेक्शन या नावाने हा व्यावसाय केला असून ती सोशल मीडियावरूनही ब्रँडिंग करत असते.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून रांगड्या राणादाची भूमिका निभावणाऱ्या हार्दिक देसाई यानेही व्यावसायात पाऊल टाकले असून कोल्हापूर बदाम थंडाई हा फुड ब्रँड सुरू केला आहे. त्याने इंस्टाग्रामवरही याबद्दल माहिती दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विद्या बालन ते रेखा, वेश्या भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

सैफ-करीना तैमूरला टाकणार बोर्डिंगमध्ये? ‘बेबो’ने शेअर केला लंडनमधील ‘तो’ फोटो

सोशल मीडिया पोस्टमुळे सतत वादात अडकणाऱ्या हिंदी-मराठी अभिनेत्री

हे देखील वाचा