Thursday, March 28, 2024

विद्या बालन ते रेखा, वेश्या भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

आपण असे अनेक कलाकार पाहिले असतील, जे वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारत असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल सिनेसृष्टीत आदरही निर्माण होतो. आशा भूमिका साकारण्यासाठी त्यांना खास तयारीही करावी लागते. तसं पाहिलं तर पडद्यावरील कोणतीही भूमिका साकारणे तसे कठीणच. पण सर्वात कठीत भूमिकांपैकी एक म्हणजे वेश्याची भूमिका. असे असले तरी काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी वेश्याची भूमिका चित्रपटांमध्ये साकारली, त्यासाठी काहींनी तर रेड लाईट एरियात जाऊन वेश्याव्यवसायाचे वास्तव जाणून घेतले होते. विशेष म्हणजे याचवर्षी रिलीज झालेल्या गंगुबाई काठीवाडी या चित्रपटात वेश्या व्यायसायाबद्दल भाष्यही करण्यात आले होते. या चित्रपटात आलिया भटने साकारलेली गंगुबाईच्या भूमिकेचे प्रचंड कौतुकही झाले. मंडळी तुम्ही म्हणत असाल आज एकदम वेश्याच्या भूमिकेबद्दल आम्ही का बोलत आहोत.

बॉलिवूडची बेबो म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे करिना कपूर. (kareena kapoor) करिनाने आजपर्यंत अनेक लक्षात राहाणाऱ्या भूमिका साकारल्यात. तिच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठी पसंतीही मिळते. करोडोंचा चाहतावर्ग लाभलेल्या करिनाने तिच्या कारकिर्दीत वेश्याची भूमिका साकारण्याचे आव्हानही स्विकारले होते, तिने चमेली चित्रपटात एका अप्रामाणिक वेश्याची भूमिका केली होती. तसेच तलाश या चित्रपटातही ती काही काळासाठी वेश्याच्या भूमिकेत दिसलेली. तिच्या या भूमिकांचे कौतुकही झाले होते.

या यादीतील पुढची अभिनेत्री म्हणजे माधूरी दिक्षित. (madhuri dixit) आपल्या आदांनी आणि सौदर्यांने अनेकांना घायाळ करणाऱ्या माधूरीनेही एका वेश्येचे पात्र निभावण्याची जबाबदारी उचललेली. तिने संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या चित्रपटात चंद्रमुखी नावाची भूमिका साकारलेली. तिच्या या भूमिकेने अनेकांचे मन जिंकले होते. तसेच या चित्रपटातील तिच्या डान्सचेही खूप कौतुक झालेले. यादरम्यान माधुरी दीक्षित प्रेग्नंट देखील होती, असे अनेक रिपोर्ट्स सांगतात.

बोल्ड अभिनेत्री म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती विद्या बालनही (vidya balan) वेगवेगळ्या भूमिका आत्तापर्यंत निभावल्यात. तीने बेगम जान या चित्रपटातही कोठेवालीचीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला अनेकदा टिकांनाही सामोरे जावे लागले होते. पण नंतर तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले.

अनेक गोड आणि सोज्वळ भूमिका केलेल्या राणी मुखर्जीने पण तिच्या करियरमध्ये वेश्याची भूमिका साकारण्याचे आव्हानही पेलले, ज्यासाठी तिच्या वाट्याला मोठे कौतुकही आलेले. तिने ही भूमिका लगा चूनरी मे दाग या चित्रपटात साकारली होती. याबरोबरच अभिनेत्री तब्बूही चित्रपटांत वेश्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. तिने चांदणी बार या चित्रपटात बारडान्सरची भूमिका निभावली होती, ज्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले होते.

केवळ आत्ताच्याच जमान्यातील अभिनेत्रींनी नाही, तर पूर्वीही काही अभिनेत्री होत्या ज्यांनी वेश्याची भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेतलेली. रेखाने अनेक हिट चित्रपट आत्तापर्यंत केले आहेत, पण तिची आस्था चित्रपटातील भूमिका लक्षवेधी ठरली. याचित्रपटात तिने वेश्या होण्याची भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारली होती. या यादीत शबाना आझमी यांचेही नाव आहे. मंडी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात वृद्ध वेश्येचे पात्र त्यांनी साकारले होते. यासाठी त्यांनी वेश्या व्यायसायाचा आभ्यासही केला होता. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटिलचे नाव अनेकांकडून घेतले जाते. तिनेही मंडी या चित्रपटातच विश्याची भूमिका निभावली होती.

तर मंडळी या होत्या वेश्याची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या बॉलिवूडमधील काही अभिनेत्री. मराठी इंडस्ट्रीमध्येही काही अभिनेत्रींनी असे आव्हान स्विकारले आहे. काहीदिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या रानबाजार सिरिजमध्ये प्राजक्ता माळी वेश्याच्या भूमिकेत दिसून आली होती.(bollywood actress who played prostitute role)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची संजय राउतांनाही भुरळ, व्हायरल व्हिडिओ शेअर करत म्हणाले, वेड…

सुष्मिता मुखर्जी यांचा सेटवर झाला अपघात, पाहा कशी करून घेतली जातेय जखमी अभिनेत्रीकडून शूटिंग

हे देखील वाचा