Tuesday, July 9, 2024

‘…मला हार्ट अटॅक येईल’, म्हणत चाहत्यांनी दिल्या अक्षया देवधरच्या मराठमोळ्या लूकवर एकापेक्षा एक प्रतिक्रिया

झी मराठी या वाहिनीवरील एक मालिका चांगलीच गाजली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ होय. या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. यासोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप चांगली ओळख मिळाली. राणाचा कोल्हापूरी रांगडा बाज आणि पाठकबाईंचा शिस्तप्रिय अंदाज प्रेक्षकांना भावाला होता. या मालिकेत ही पात्र हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निभावली होती. दोघांच्या अभिनयाला देखील खूप चांगली दाद मिळाली होती. या मालिकेने बऱ्याच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्हीही कलाकार आजही प्रेक्षकांशी जोडून आहेत. अशातच अक्षयाचे काही फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

अक्षयाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मराठमोळ्या‌‌ वेशात दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने जांभळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली असून, यावर तिने लाल रंगाचा डिझाईन असलेला ब्लाउज घातला आहे. यासोबतच तिने तिचा मराठमोळा साजशृंगार केला आहे. गळ्यात मोठे मंगळसूत्र, गळ्यातील ज्वेलरीला मॅचिंग असे कानातले आणि बांगड्या घातल्या आहेत. कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळला आहे. या लूकमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.
(Marathi actress akshaya deodhar share her traditional look photos on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “सुंदरा मनामध्ये भरली” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “एवढी सुंदर कशी काय दिसतेस मला हार्ट अटॅक येईल.” तसेच आणखी बरेच चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा हार्दिक जोशी सध्या झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा