अलका कुबल (Alka Kubal) हे नाव माहित नसेल असा एकही सिनेप्रेमी सापडणार नाही. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि कौंटुंबिक भूमिका साकारुन त्यांनी प्रत्येक घराघरात आणि मनामनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे सर्वच चित्रपट प्रचंड गाजलेले परंतु सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’. त्यांचा हा चित्रपट म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरहीट चित्रपट म्हणून ओळखला जातो. तीस वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ आणि लोकप्रियता अबाधित आहे. सध्या अलका कुबल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘माहेरची साडी’ चित्रपटातील गाणे लावून त्यांना निरोप दिल्याचे दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
अभिनेत्री अलका कुबल सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यक्त आहेत. त्यांचे सोशल मीडियावर लंडनमधील अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्यासोबत अभिनेत्री पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकारदेखील लंडनमध्ये दिसत आहेत. नुकतेच अलका कुबल यांचे चित्रपटातील शूटिंग पुर्ण झाले. यामुळेच त्यांच्यासोबत असलेल्या टीमने त्यांना माहेरची साडी चित्रपटातील गाणी लावून खास निरोप दिला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
लोकेश गुप्ते यांनी हा खास व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये अख्खी टीम मिळून त्यांचा सेंन्डऑफ देताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी “अलका ताई तुमच्या सोबत काम करुन एक वेगळेच समाधान मिळाले माझ्या संपूर्ण टीम ला. खूप काही शिकायला मिळाले. तुमची काम करण्याची पद्धत , एनर्जी , कामाप्रती असलेली तुमची श्रद्धा सगळेच Hatsoff खूप काम करायचे आहे तुमच्याबरोबर भविष्यात सुद्धा.” असा सुंदर कॅप्शन दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा –
ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या
‘लायकी नसलेल्या लोकांच्या हातात आपण देश दिला…’ अभिनेता सुबोध भावेचा संताप
शेवटी जुळलंच! मल्हारचा गुंतला अंतरामध्ये जीव, जाहीरपणे देणार प्रेमाची कबुली