×

‘माहेरची साडी’ फेम अलका कुबल यांची लेक चालली सासरी, लग्नाचे फोटो भन्नाट व्हायरल

मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला आहे. अनेक सिनेमे आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर ती चालवले आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सासू, लेक, सून, आई अशा स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा त्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून प्रेक्षकांच्या समोर आणल्या आहेत. अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये त्यांची थोरली मुलगी ईशानी नुकतीच लग्न बेडीत अडकली आहे. ईशानीचे लग्न फार थाटामाटात पार पडले. अलका कुबल यांनी शेअर केलेल्या ईशानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलका कुबल आठल्ये (Alka Kubal Athalye) आणि समीर आठल्ये (Sameer Athalye) यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव ईशानी आणि छोट्या मुलीचे नाव कस्तुरी आहे. नुकतेच ईशानीचे लग्न थाटामाटात पार पडले. तिचे लग्न निशांत वालिया याच्याशी झाले आहे. अलका कुबल यांनी कॅमेरात टिपलेले काही क्षण अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

ईशानी नेहमीच हरहुन्नरी आणि हुशार अशी विद्यार्थीनी होती. तिने जिद्द ठेवली होती की, समाजात आपले वेगळे स्थान निर्माण होईल असे काहीतरी करून दाखवायचे. आपल्या आईप्रमाणे अभिनयक्षेत्रात न येता तिने वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले.

View this post on Instagram

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

ईशानी ही पायलट आहे. ती वयाच्या २३ व्या वर्षी पायलट बनली आहे. लहान असल्यापासूनच ईशानीला पायलट व्हायचे होते आणि तिने तिचे हे स्वप्न पूर्ण केले.

View this post on Instagram

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

हेही पाहा- ६०-७० च्या दशकात Bikini सीन्सने वाद निर्माण करणाऱ्या Bollywood अभिनेत्री 

अलका कुबल यांनी ‘सोबती’, ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवा छपवी’, ‘येडा की खुळा’, ‘जखमी कुंकू’, ‘शिर्डी साईबाबा’, ‘ओवाळणी’, ‘आई तुझा आशिर्वाद’, ‘अग्नीपरीक्षा’, ‘सुर राहू दे’, ‘ते दोन दिवस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा-

Latest Post