सोशल मीडिया हे आजकाल असे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती अगदी मन मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. आपल्या मनातील सुख-दुःख तसेच आयुष्यातील काही प्रसंग शेअर करण्यासाठी तो एखाद्या व्यक्तीपेक्षा सोशल मीडियाला प्राधान्य देताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांसाठी तर सोशल मीडिया हे त्यांचे दुसरे जग असते. त्यांची माहिती, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. अशीच सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लागोपाठ चाहत्यांच्या कमेंट येताना दिसत आहे. (Marathi actress Amruta Khanvilkar’s photo viral on social media)
अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ती नेहमी प्रमाणेच या फोटोमध्ये खूपच बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने ब्राऊन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या स्लिव्हलेस साईड कट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या न्यूड मेकअपमध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. काही फोटोंमध्ये तिने खुर्चीवर बसून पोझ दिल्या आहेत.
तिने अत्यंत बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत. या फोटोवर कमेंट करून चाहते कौतुकाचे पूल बांधत आहे. हे फोटो पाहून तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तूच एक कविता आहे तुझ्यावर आणखी काय लिहू? आरशात माझ्यापेक्षा तुलाच कितीदा पाहू?” यासोबतच अनेक कलाकारांनी देखील तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. तिच्या या फोटोवर अभिनेत्री सायली संजीव, ऋतुजा बागवे, प्रसाद ओक यांनी कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’