Wednesday, March 12, 2025
Home मराठी ‘वाजले की बारा’ म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला थिरकवणाऱ्या अमृताने केले साडीतील फोटो शेअर; सई म्हणाली…

‘वाजले की बारा’ म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला थिरकवणाऱ्या अमृताने केले साडीतील फोटो शेअर; सई म्हणाली…

‘वाजले की बारा’ या लावणीवर डान्स करून आख्ख्या महाराष्ट्राला थिरकायला लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर होय. तिच्या फॅशन सेन्सने तिने सर्वांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा चांगलाच वावर असतो. तिचे हटके फोटो ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोला जोरदार प्रतिसाद देत असतात. अशातच अमृताचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले हटके फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची एक साधी आणि सुंदर साडी नेसली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा मिसमॅच स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेला आहे. तिने कानात मोठे इअरिंग घातले आहेत. यावर तिने बाकी कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही. कपाळी एक छोटी टिकली लावलेली आहे. तिने खूप सुंदर मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

अमृताने शेअर केलेले हे फोटो सर्वांना खूप आवडत आहेत. तिचे अनेक चाहते आणि कलाकार या फोटोवर कमेंट करत आहे. तिच्या या फोटोवर सोनाली खरे, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने “मस्तच मेकअप! भारीच,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “सोनपरी,” अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोला ४० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते देखील सातत्याने कमेंट करत आहेत. (marathi actress amruta khanvilkar’s saree photo viral on social media)

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

हे देखील वाचा