‘तुझ्यात जीव रंगला’ ही झी मराठी वरील मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेची कथा आणि कलाकारांचा जोरदार अभिनय यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा पैलवानी थाट असो किंवा सोज्वळ पाठक बाईंचा साज असो प्रत्येक भूमिका प्रचंड गाजली परंतु यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती नंदिता वहिनींची म्हणजेच धनश्री काडगावकरची. वहिनींच्या प्रत्येक डायलॉगची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळाली. अशीच चर्चा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची रंगली आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नंदिता वहिनींच्या म्हणजेच धनश्री काडगावकच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रतिसाद मिळाला. मालिकेत ठसकेबाज खलनायकी भूमिकेत नंदिताने आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यामुळेच मालिकेतून धनश्री काडगावकरने ब्रेक घेतला, मालिका संपली तरीही त्यांच्या या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगताना दिसत असते. विशेषतः मालिकेत त्यांचा डोक्यात फॉल्ट आहे हा डायलॉग तर विशेष गाजला. कोल्हापूर करांनी त्यांच्या या डायलॉगला विशेष प्रेम दिले त्यामुळेच सध्या नंदिता वहिनींची म्हणजेच धनश्री काडगावकरची कोल्हापूर करासांठी केलेली खास पोस्ट सध्या चांगलीच गाजत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री धनश्री काडगावकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री धनश्री काडगावकर लाल रंगाचा टी – शर्ट घातलेला दिसत आहे. या लाल रंगाच्या टी- शर्टवर डोक्यात काय फॉल्टय काय असे शब्दच लिहलेले दिसत आहेत. या फोटोसोबत धनश्री काडगावकरने “व्हय की व्हय, लिटिल लिटिल फ़ॉल्ट हाईच खरं आमच्या डोस्क्यात,” असा कॅप्शन दिला आहे तसेच तीने ही खास पोस्ट फक्त कोल्हापूरकरांसाठी असल्याचेच म्हणले आहे. सध्या वहिनी साहेबांच्या या पोस्टची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान तुझ्या जीव रंगला मालिका चालू असतानाच अभिनेत्री धनश्री काडगावकरने प्रेग्नेंसीमुळे ब्रेक घेतला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा