Thursday, April 25, 2024

‘ये काली काली आँखे’ या वेबसिरीजमधील आंचल सिंग नक्की आहे तरी कोण?

ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या प्रेक्षकांचा जीव की प्राण झालाय. यामागे कारणही तसंच आहे मंडळी. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हटके, भन्नाट विषय घेऊन येतोय. याचवर्षी १४ जानेवारीला ‘ये काली काली आँखे’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीझ झाली. आता तुम्ही म्हणाल, अरे हे तर किंग खानच्या ‘बाजीगर’मधलं गाणंय. हो मंडळी बरोबर बोललात. ‘ये काली काली आँखे’ हे शाहरुखच्या (shahrukh)’बाजीगर’ सिनेमातील गाण्याचं नाव असलं, तरी आता या नावाने वेबसीरिज आलीय. यात रोमान्सपेक्षा जास्त थ्रिलर दाखवण्यात आलाय. या वेबसीरिजने येताच धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. ये काली काली आँखेमागे प्रेम, धोका आणि अपराधाची एक कहाणी आहे. हा पहिला सीझन असून यात ८ एपिसोड आहेत. पण या सर्वांमध्ये चर्चा होतेय, ती अभिनेत्री आंचल सिंगची. (anchal singh)कारण, वेबसीरिजमधील तिचा दमदार अभिनय आणि बोल्डनेसने सर्वांनाच घायाळ केलंय. पण कोण आहे ही, आंचल सिंग, का होतेय तिची चर्चा. तेच आपल्या व्हिडिओचा विषय आहे. चला तर जाणून घेऊया…

आंचलबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण या वेबसीरिजची स्टोरी काय आहे हे पाहूया. ‘ये काली काली आंखे’ या वेबसीरिजमध्ये प्रेम, क्राईम आणि थ्रिलर दाखवलाय. यात आंचल सिंगने मुख्य भूमिका साकारलीय. ती पूर्वा हे पात्र निभावतेय. तिचे वडील हे राजकारणी असतात. पूर्वा लहानपणापासून विक्रांतवर म्हणजेच अभिनेता ताहिर भसीनवर प्रेम करत असते. विक्रांत हे तिचं लहानपणीचं प्रेम असतं. त्याला मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाते. पण दुसरीकडे विक्रांतच्या मनात शिखा म्हणजेच श्वेता त्रिपाठी असते. तिच्यावर त्याचं प्रेम असतं. पण पूर्वा विक्रांतच्या आयुष्यात प्रवेश करताच त्याची कोणतीच स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर सौरभ शुक्ला आणि आंचल सिंग या वेबसीरिजमध्ये लग्नगाठ बांधतात. आंचल या सीरिजमध्ये पूर्वाच्या व्यक्तिरेखेमध्ये खोलवर गेली आहे आणि तिला या भूमिकेत पडद्यावर ती या वेबसीरिजचा चर्चेचा विषय ठरली आहे, तर वळूया आंचल सिंग कोण आहे या विषयाकडे.

दोन भावंडांमध्ये सर्वात छोटी असलेल्या आंचलचा जन्म ५ एप्रिल, १९९२ रोजी जवळपास साडे नऊ लाख लोकसंख्या असलेल्या चंदीगडमध्ये झाला होता. तिचे वडील वायू सेनेत अधिकारी, तर आई प्राध्यापिका आहे. ग्लॅमरच्या दुनियेत आंचलला पहिला ब्रेक हा ‘देना बँके’च्या एका जाहिरातीतून मिळाला होता. तिने रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, ऋतिक रोशन यांसारख्या सुपरस्टार्ससोबत ३०० हून अधिक कमर्शियल्समध्ये काम केलंय.

आंचलने अभिनयक्षेत्राचं दार ठोठावलं, ते २०१३ साली आलेल्या ‘श्री सिद्धार्थ गौतम’ या श्रीलंकन सिनेमातून. या सिनेमात तिने राजकुमारी यशोधराची भूमिका साकारली होती. लय भारी गोष्ट म्हणजे, या सिनेमाने अशी काही कमाल केली की, तो सिनेमा श्रीलंकेन सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. हा सिनेमा २०हून अधिक देशांमध्ये रिलीझ करण्यात आला होता. या सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. हा सिनेमा मंदारिन, थाई, व्हिएतनामी आणि हिंदी भाषांमध्येही डब करण्यात आला होता. यानंतर ती जगातील सर्वात मोठ्या सिनेसृष्टींपैकी एक असलेल्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सिनेमातही झळकली. तिने २०१३ साली ‘रमैय्या वस्तावैया’ आणि २०१४ साली सुपरस्टार अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ या सिनेमात काम केलं होतं.

यानंतर ती तमिळ चित्रपट ढिल्लुकू धुड्डू आणि पंजाबी चित्रपट जख्मीमध्येही झळकली. तिने २०२० मध्ये रिलीझ झालेल्या ‘अनदेखी’ या वेब सीरिजमध्येही काम केलंय.

विषयाचा शेवट करताना आंचलविषयी माहिती नसलेल्या एक- दोन गोष्टी सांगून टाकू. आंचल ही खाण्याची शौकीन आहे. तिला हेल्दी फूड्स खूप आवडतात. पण जेव्हा चीटिंग करायची असते, तेव्हा ती पिझ्झा, आईस्क्रीम आणि चॉकलेटवर ताव मारते. आणखी एक गोष्ट म्हणजे, तिला जिममध्ये व्यायाम करायला आणि ट्रॅव्हेलिंग करायला खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा