सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच पक्षातील मंत्र्यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचे बहुमत धोक्यात आले आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणाकडे प्रत्येकाचे लक्ष लागले असून अनेक कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याच संदर्भातील अभिनेत्री हेमांगी कवीची (Hemangi Kavi) सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. काय आहे ही पोस्ट चला जाणून घेऊ.
हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी ती नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच विविध विषयावरील तिचे मत व्यक्त करताना दिसत असते. सध्या हेमांगीची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तत्पुर्वी अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच तमाशा लाइव्ह या चित्रपटात झळकणार आहे. ज्याचे सध्या ती जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याचसंदर्भातील पोस्ट हेमांगी कवीने केली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीने सुरूवातीला “आता कुणाला खरा वाघ म्हणायचं” असा कॅप्शन असलेली पोस्ट आपल्या फेसबूक अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यापाठोपाठ लगेच हेमांगीने तिच्या तमाशा लाइव्ह चित्रपटातील गाणे पोस्ट करत “सुत्र ह्याला खरा वाघ म्हणतात” असा मजेशीर कॅप्शन दिला आहे.
https://www.facebook.com/100000289144138/videos/433679285010156/
यासोबत हेमांगीने चित्रपटातील वाघ आला हे गाणेही पोस्ट केले आहे. हेमांगीच्या या दोन्ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत असून नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवीची अशा पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. इतकेच नव्हेतर अशा पोस्टमुळे अनेकदा हेमांगीला नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- Viral Video: अभिनेत्री अमिषा पटेलच्या बोल्डनेसचा कहर, व्हायरल व्हिडिओने केले नेटकऱ्यांना घायाळ
- कॅरी मिनाटी ते प्राजक्ता कोहली, ‘हे’ लोकप्रिय युट्यूबर गाजवतायेत बॉलिवूड इंडस्ट्री, पाहा संपूर्ण यादी
- ठरल तर! राणादा पाठक बाईंनी लग्नासाठी निवडले ‘हे’ ठिकाण, हार्दिक जोशीने लग्नाबद्दल केला महत्वाचा खुलासा