Saturday, June 29, 2024

‘…आणि हे मराठी कलाकार’, टीका करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली…

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री हेमांगी कवीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. हेमांगी कवी तिच्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. तिची अनेक वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तव्ये सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. सध्या तिच्या अशाच एका कमेंटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्याला खडेबोल सुणावले आहेत.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) दिवाळीच्या निमित्ताने तिच्या कुटुंबीयांबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना तिने तिच्या शैलीत कॅप्शन दिलं. या कॅप्शनवर एका नेटकऱ्याने टीका केली. अभिनेत्रीनेही त्याला रोखठोक उत्तर दिलं.हेमांगी कवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाव शेअर करत असते. तिच्या पोस्टवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत असतात.

हेमांगी कवीने तिच्या नवऱ्याबरोबरचा एक फोटो शेअर करत याला “मी तुझी लक्ष्मी तू माझ्याकडेच पहा, होणारे मीच प्रसन्न ऐक सल्ला हा महा! बाकी तुमच्यावरही लक्ष्मी प्रसन्न होवो ह्याच शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन” असं कॅप्शन दिलं. या कॅप्शनमध्ये “होणारे” या शब्दावरून एका नेटकऱ्याने अभिनेत्रीवर टीका केली. त्याने म्हटलं की, “होणारे नाही, होणार आहे. आणि हे मराठी कलाकार…”

यावर हेमांगी कवीने रोखठोक उत्तर देत म्हटलं की, “बाकी कॅप्शन व्यवस्थित लिहिलंय ते दिसत नाही. म्हणजे किती नकारात्मक असावं नाही का एखाद्याने! मोठ्या शुभ्र पांढऱ्या कॅनव्हासवर सूक्ष्म काळा ठिपका बघणाऱ्या हे लोक! च च च!” हेमांगी कवीच्या या उत्तराचं चाहत्यांनी समर्थन केलं. त्यांनीही त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं.

दरम्यान, हेमांगी कवीने नुकतेच रवी जाधव यांच्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीमध्येही झळकली आहे. (Marathi actress Hemangi Kavi gave a blunt reply to the netizen comment)

आधिक वाचा-
घटस्फोट झाल्यावरही एकमेकांच्या प्रेमात गुंतले बॉलीवूडचे ‘हे’ जोडपे; एकदा वाचाच
प्रेक्षकांचा थिएटरमध्ये राडा, सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडून घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा