Wednesday, February 21, 2024

मोठी बातमी : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मराठी कलाविश्वाला हादरा देणारी एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह इतर अनेक मालिकांत काम केलेली अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बातमीने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. ( Marathi Actress Kalyani Kurale Jadhav Passed Away )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिने दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने हाॅटेल सुरू केले होते. ते हाॅटेल बंद करुन बाहेर पडताना एका भरधाव डंपरने कल्याणीला धडक दिली ज्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर-सांगली महामार्ग पूर्णत: खड्ड्यात गेल्याने मृत्यूचाच सापळा झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.

अधिक वाचा –
‘अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी लेखलं जातं;’ म्हणत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील भेदभावावर स्पष्टच बोलली रवीना टंडन

हे देखील वाचा