‘ट्रोल करून कटू व्यक्ती होण्यापेक्षा, बरे वागायला शिका’, वाचा अभिनेत्री केतकी चितळेची संपूर्ण पोस्ट


अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम करून, चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री आपल्या ठाम मतांसाठी आणि विधानासाठीही चर्चेत असते. कितीही तिरस्काराचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला तरी केतकी कधीही हार मानत नाही आणि आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. अशातच मराठमोळी केतकी तिच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

शुक्रवारी (१४ जानेवारी) सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात. कोव्हिड नियमांचे पालन करून सर्वजण हा सण आपापल्या घरात साजरा करत आहेत. अशातच कलाकारमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान केतकी चितळेनेही नेटकऱ्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट समोर आल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. (Marathi actress ketaki chitale gave spicy wishes of makarsankranti)

केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शुभेच्छा देणारी ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे की, “संक्रांतीच्या शुभेच्छा. फक्त गोड बोलू नका, वागायला शिका. गोड तिळगुळ खाऊन, कटू सत्य बोलायला शिका. ट्रोल करून कटू व्यक्ती होण्यापेक्षा, बरे वागायला शिका.” ही सणसणीत पोस्ट शेअर करून, केतकीने जणू काय ट्रोलर्सच्या कानशिलातच लगावली आहे! आता या पोस्टवर नेटकऱ्यांनी ही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण यावर पुन्हा केतकीला ट्रोल करत आहेत. तर काही तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

केतकीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘Mr & Mrs सदाचारी’ पासून केली होती. तसेच तिने ‘आंबट गोड’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर एन्ट्री केली. यात तिने अबोली ही व्यक्तिरेखा साकारली होती, जिला रसिकांचे खूप प्रेम मिळाले आणि याच मालिकेमुळे केतकी घराघरात ओळखीचा चेहरा बनली. याशिवाय तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!