Friday, July 5, 2024

समीर वानखेडेंना क्लिनचिट मिळाल्यानंतर क्रांती रेडकरची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘आर्यन खान…’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aaryan Khan) अटक झाल्यानंतर मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. या कारवाईचे प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांंमुळे समीर वानखेडे अडचणीत आले होते. मात्र आता या प्रकरणात समीर वानखेडे यांना क्लिनचिट मिळाली असून अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) खास पोस्ट करत याची माहिती आपल्या चाहत्यांंना दिली आहे. 

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी पती समीर वानखेंडेवर झालेल्या  बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यावेळी समीर वानखेडेंसह क्रांती रेडकरवरही जोरदार टिका झाली होती. हे प्रकरण देशभर प्रचंड गाजले होते. याच महत्वाच्या विषयावर आता कोर्टाने समीर वानखेडे यांना क्लिनचिट दिली आहे. याबद्दलचीच क्रांती रेडकरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रांतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने  “आर्यन खान भ्रष्टाचार प्रकरणात आधी क्लीन चिट आणि आता हे. सत्याचा नेहमी विजय होतो! सत्यमेव जयते, जयहिंद अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकारांसह तिच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान क्रांती रेडकरने काकण, करार, कुणी घर देत का घर, गंगाजल, मर्डर मिस्त्री अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा –‘साठ वर्षाचा अभिनेता ३० वर्षाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो’, विवेक अग्निहोत्री यांनी साधला आमिर खानवर निशाणा
लागोपाठ दोन सिनेमांच्या रिलीझपूर्वीच विक्रमने ट्विटरवर उघडले अकाऊंट, झटक्यात वाढले ‘एवढे’ फॉलोव्हर्स
सुपरहिट ‘उ अंटावा’ गाण्याचे भोजपुरी वर्जन तुम्ही पाहिले का? व्हायरल व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

 

हे देखील वाचा