सुपरहिट ‘उ अंटावा’ गाण्याचे भोजपुरी वर्जन तुम्ही पाहिले का? व्हायरल व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो चित्रपट तेव्हापासूनचं बाजारात चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील संवादांपासून ते गाण्यापर्यंत प्रेक्षकांना खूप पसंती मिळत आहे. जर तुम्ही पुष्पा हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्याचे आयटम साँग ‘ऊ अंटवा’ तो आठवत असेल.

समंथा रुथ प्रभू (Samantha ruth prabhu) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या आयटम साँगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या गाण्याने सोशल मीडियावरही चांगलीच धुमाकूळ घातला होता. नुकताचं साऊथमधील या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन आला आहे. जे तुम्ही कदाचित अजून ऐकले नसेल. भोजपूरी संगीतकार टुनटुन यादव(Tuntun Yadav) या गाण्यात पुष्पा राजच्या भूमिकेत दिसत आहे. सृष्टी भारती (Shrishti bharti) हिने समंथा रुथ प्रभूप्रमाणे आपल्या पतली कंबरेच्या जादू चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या ‘2 कठ्ठा जमीन द’ या गाण्याची धूनवर प्रेक्षकांना आपल्या इशारावर नाचवताना दिसत आहे. टुनटुन यादवचे हे गाणे दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झाले होते. टुनटुन यादवला त्याची बहुतेक गाणी टुनटुन म्युझिक वर्ल्डवर रिलीज करायला आवडतात. आणि हे गाणे त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर रिली़जही केले आहे. हे गाणे दोन आठवड्यात 2 मिलियन पेक्षा जास्तवेळा पाहिले गेले आहे. लाखो प्रेक्षक या गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत.

‘2 कठ्ठा जमीन द’ गाण्याची वाढती लोकप्रियता पाहिल्यानंतर प्रेक्षक या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन ऐकण्याची वाट पाहत असल्याचे दिसून आले आणि या प्रेक्षकांची विनंती ऐकून टुनटुन यादवने हे गाणे रिली़ज करुन खळबळ उडवून दिली आहे. या गाण्यात सृष्टी भारती आणि टुनटुन यादव यांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. सामंथा आणि अल्लू अर्जुनची हुक स्टेप कॉपी करण्याचा दोघांनीही पुरेपूर प्रयत्न केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, कुटूंबियांनी गुरुद्वारामध्ये जाऊन केली प्रार्थना

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकणे पडले भारी, साधू देवनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

भयंकर! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःलाच समजू लागला भूत, पेटवून घेत केली आत्महत्या

Latest Post