Friday, July 5, 2024

विंडो सीटसाठी क्रांतीने विमानात घातला राडा, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली ‘ही’ सुवर्ण संधी

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. त्याशिवाय सामाजता होणाऱ्या घडामोंडींवरही क्रांती बिंदास्तपणे आपले मत व्यक्त करत असते. नुकंतच अभिनेत्रीने एक नवीन फोटो शेअर केला आहे. जो भलताच चर्चेत आला आहे.

मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने  इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मात्र, लग्न झाल्यानंतर जरी ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी अभिनेत्री सतत आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिने नुकतांच एक फोटो शेअर केलेला आहे, ज्यामध्ये क्रांती विमानात प्रवास करत असून कोणाला तरी भांडताना दिसून येत आहे. या फोटोमागची कथा नेमकं आहे तरी काय? (Mrathi Acress Kranti Redkar Post Viral)

झाले असे की, क्रांतीने जो फोटो शेअर केला आहे तो ‘रेन्बो’ (Renbow) चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. क्रांतीचा आगामी येणारा चित्रपट रेन्बो मधील विमानाचा सिन दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये क्रांती कॅप्टन ऑफ द शीप असल्यामुळे दिग्दर्शकाच्या भुमिकेत दिसून येत आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव आणि ती भांडत असल्यासारखे भाव दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

क्रांतीने सिनेमाच्या सेटवरच हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ”माझ्या डीओपी वर मी रागावलेली नाही..तेव्हा मला या फोटोसाठी कॅप्शन सुचवा…”, मग काय चाहत्यांनासाठी तर ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. चाहत्यांनी देखिल क्रांतीने शेअर केलेल्या फोटोवर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव करत भन्नाट कॅप्शन अभिनेत्रीला सुचवले आहे. त्यापैकी एक युजरने लिहिले की, “विंडो सीट साठी क्रांती भांडत आहेस का?” तर दुसऱ्याने लिहिले की, “तुला सांगितलेलं बाहेर बस, आता सारखा टॉयलेटला जातोयस तर मला उठावं लागतंय…”

क्रांतीचा आगामी येणारा चित्रपट रॅम्बो यामध्ये सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), ऋषी सक्सेना सारखे धमाकेदार कलाकर या चित्रपटामध्ये काम करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तेजी बच्चन यांचा श्वास कोंडला…’, अमिताभ बच्चन यांना आठवले आईचे शेवटचे क्षण
आली लहर केला कहर! ‘आरआरआर’ने जगातल्या सर्वोत्तम 50 सिनेमांच्या यादीत टॉम क्रूझलाही टाकलं मागं

हे देखील वाचा