Tuesday, April 16, 2024

घटस्फाेटाच्या चर्चेवरून उर्मिला कोठारेचं माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘ब्रेकअप झालं…’

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फाेटाच्या बातम्या समाेर आल्या हाेत्या, ज्यामध्ये मानसी लवकरच घटस्फाेट घेणार असल्याचं बाेललं जातंय. मानसीच्या घटस्फाेटाच्या बातम्या संपत नाही, अशातच आता लाेकप्रिय अभिनेत्री उर्मिला काेठारे हिने एक धक्कादायक पाेस्ट शेअर केली आहे. ही पाेस्ट साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके पाेस्टमध्ये चला जाणून घेऊया…

अभिनेत्री उर्मिला (urmila kothare) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे. पाेस्टमध्ये उर्मिलाने लिहिले की, “ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला and Just Feel It.. ” मात्र, मंडळी अभिनेत्री उर्मिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत न बाेलता ती तिच्या चित्रपटातील गाण्याबाबतीत बाेलत आहे. अभिनेत्रीनं ही पाेस्ट केवळ तिच्या गाण्याचं प्रमाेशन करण्यासाठी केली आहे. लवकरच अभिनेत्रीचा ‘ऑटोग्राफ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उर्मिला व्यतिरिक्त अंकुश चाैधरीही मुख्य भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

तरीदेखील काही दिवसांपुर्वी उर्मिला आणि आदिनाथ काेठारे यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे म्हणटले जात हाेते. मात्र, काहीच दिवसात या बातम्या अफवा असल्याचे स्वत: आदिनाथने सांगितले हाेते. उर्मिला-आदिनाथ पहिल्यांदा ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले हाेते. या सिनेमामुळे आदिनाथ-उर्मिलाची प्रेमकथा सुरु झाली आणि हे जाेडपं 2011मध्ये विवाह बंधनात अडकले. या गोड जोडीला एक गोंडस लेक देखील आहे. उर्मिला-आदिनाथ मुलीसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. (marathi actress urmila kothare divorce it is said that the breakup has happened there is trouble the post is viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा’ चित्रपटाच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘जळफळाट’ तर रिषभ शेट्टीने दिले धमाकेदार उत्तर

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

हे देखील वाचा