Tuesday, July 9, 2024

‘प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो’, म्हणत मानसी नाईकने शेअर केले तिचे लक्षवेधी फोटो

अभिनेत्री मानसी नाईक हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसीने आकाशी रंगाची साडी नेसली आहे. हातात हिरवा चुडा घातला आहे. नाकात नथ घातली आहे. तसेच गळ्यात एक सुंदर मंगळसूत्र घातले आहे. या फोटोमध्ये एकंदरीतच ती खूप सुंदर दिसत आहे. ( Marathi actress Manasi naik share her photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने एक खास आणि लक्षवेधी कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश मिळते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त असली पाहिजे.” तिच्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा