Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…

‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…

मराठी चित्रपटसृष्टीत ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे, ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडिया देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मस्तानीप्रमाणे लूक केला आहे. तिने यामध्ये पिस्ता कलरचा ड्रेस घातलेला दिसत आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिचे मस्तानीच्या वेशातील हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडत आहेत. (Marathi actress Manasi naik’s mastani look photos viral on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मैं नहीं गाती, मेरी मोहाब्बत गाती है. मैं नहीं नाचती किसी के लिये, मेरा दिल नाचता है. और यह तब होता है, जब मेरा मेहबूब मेरे पास हो.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. खास म्हणजे तिच्या या फोटोवर तिचा पती प्रदीप खरेरा याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “खूप सुंदर दिसत आहेस. आय लव्ह यू” यासोबत तिचे अनेक चाहते तिच्या या नवीन लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा