स्टार प्लस या चॅनेलवरील ‘इमली’ या मालिकेतून सध्या रसिकांचे मनोरंजन करणारी मयुरी देशमुख चांगलीच चर्चेत असते. मालिकेत सुरुवातीला मुख्य भूमिकेत वाटणारी मयुरी कधी या मालिकेत खलनायिका झाली हे समजलेच नाही. तसे पाहायला गेले, तर मयुरीने या आधी मराठीमध्ये देखील काम केले आहे. मयुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या युजर्सपैकी एक आहे. आजकाल तर सगळेच सोशल मीडिया वापरतात. आपली प्रत्येक गोष्ट, भाव-भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्याचे सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येकजण या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत असतो. त्यात कलाकार म्हटल्यावर तर ते त्यांची प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना देत असतात. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मयुरीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा लूक अगदी बघण्यासारखा आहे. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी साडी नेसली आहे. तिच्या साडीमध्ये गुलाबी, हिरवा, पांढरा असे रंग दिसत आहेत. या प्लेन साडीवर तिने गुलाबी रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातलेला दिसत आहे. तसेच सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. मयुरीने केसांचा अंबाडा घालून मोगऱ्याचा गजरा माळला आहे. एकंदरीत या लूकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. (Marathi actress mayuri Deshmukh share her saree look photos on social media)
हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “ख्वाबिदा.” तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “सिंपल सिंपल सिंपल हवी, सिंपलमध्ये डिंपल हवी.” तर आणखी एका चाहत्याने “अस्सल मराठी सौंदर्य” अशी कमेंट केली आहे.
मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच लवकरच ती सिद्धार्थ जाधवसोबत ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी