मराठी टेलिव्हिजनवर तसेच चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका निभावून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. मयुरीने झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम करत सर्वांची मने जिंकली. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. या मालिकेतील तिचा अभिनय सर्वांना खूप आवडला. तिच्या निरागस हास्याने आणि स्वभावने प्रेक्षकांना वेड लावले. या मालिकेची कहाणी देखील सर्वांनाच आवडली. मयुरीचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोविंग आहे. टेलिव्हिजनवरील लक्षवेधी अभिनेत्री असणाऱ्या मयुरीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मयुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेस घातला असून, केसांची पोनीटेल बांधली आहे. तसेच पायात काळ्या रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. यासोबतच तिचा मेकअप देखील खूप सुंदर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने तिचा आय मेकअप लक्षवेधी ठरत आहे.
मयुरीने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणेच खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. अभिज्ञा भावे आणि ऋतुजा बागवे यांनी कमेंट केली आहे. तसेच इतर चाहते देखील हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “निले निले अंबर पार चांद जब आये.” (marathi actress mayuri deshmukh’s glamrous photos viral on social media)
मयुरीने अगदी मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. तिने सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तिने ‘३१ दिवस ‘, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे. तसेच तिचे ‘ग्रे’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे दोन आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण