Monday, July 8, 2024

‘बडी चंचल पवन है और मैं हूँ’, म्हणत मितालीने केला भन्नाट फोटो शेअर; पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

फोटोग्राफी हा कलाकारांचा एक छंदच असतो. जाईल तिथे, ते त्यांचे फोटो काढत असतात. अनेकवेळा तर केवळ फोटोसाठी ते फिरायला जातात. खरंतर फोटोग्राफी हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेकवेळा कलाकारांचे फोटो आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अशातच अभिनेत्री मिताली मयेकर हिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये कोणत्याही मेकअपशिवाय तिचे सौंदर्य अगदी खुलले आहे.

मिताली मयेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक कँडिड फोटो शेअर केला आहे. मितालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. यासोबत तिने नोजपिन घातलेली आहे. तसेच हिरव्या रंगाची टिकली लावली आहे. तसेच केस मागे बांधलेले आहेत. ती एका झोपाळ्यावर बसलेली आहे. या फोटोमधील तिची स्माईल खूपच सुंदर आहे.

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “बडी चंचल पवन है और मैं हूँ.” तिचा हा फोटो चाहत्यांना खास पसंत पडला आहे. या फोटोवर अभिनेत्री गायत्री दातार हिने “सुंदरी,” अशी कमेंट केली आहे. तसेच अन्विता फलटणकर हिने हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. यासोबतच तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच हा फोटो मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिने नुकतेच झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्मिता तांबे आणि आरोह वेलणकर हे होते. या मालिकेतील स्मिता तांबेचे मम्मी हे पात्र खूप गाजले होते. (marathi actress mitali mayekar’s candid photo viral on social media)

मितालीने २०२१ च्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले होते. ते दोघे अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी यावर्षी लग्न केले. त्यांचे लग्न थाटामाटात झाले. अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील जोरदार व्हायरल झाले होते. सिद्धार्थ देखील एक अभिनेता आहे. तो सध्या स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दीपिका कक्करला शोएबच्या घरातील ‘नोकरानी’ म्हणल्याने भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘तुमच्या आईलाही असंच बोलता का?’

-‘…सारखा सारखा काय अभ्यास करायचा’, प्रार्थना अन् मायराचा मजेशीर व्हिडिओ भन्नाट व्हायरल; तुम्हीही पाहा

-जेव्हा करीनाने कॅटरिनाला म्हटले होते आपली ‘वहिनी’, पाहण्यालायक होती रणबीरची रिऍक्शन

हे देखील वाचा