Tuesday, July 9, 2024

‘उफ्फ तेरी ये अदा’, मिथिला पालकरच्या नवीन फोटोने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

मराठी अन् हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री मिथिला पालकर होय. आपल्या साध्या वेशभूषेत ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. खास करून पारंपारिक पद्धतीचा पोशाख ती परिधान करत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे घनदाट कुरळे केस. सोशल मीडियावर देखील तिला मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांकडून प्रेम मिळत असते. आजकाल अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

मिथिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. ज्यामध्ये ती फार सुंदर दिसत आहे. तिच्या ब्लाऊजवर वेगवेगळ्या रंगाची फुले दिसत आहेत. या ड्रेसवर तिने केवळ एक कानातले घातले आहेत. याशिवाय तिने कोणतीही ज्वेलरी घातली नाही. तरीही ती खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress mithila palkar share her photos on social media)

मिथिलाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर तिचे चाहते अक्षरशः कौतुकाचा पाऊस पाडत आहे. या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मिलकर आपसे प्यार करने को दिल चाहता है, आपके जुलफो के जाल मे खोने को दिल चाहता है.” आणखी एका चाहत्याने “उफ्फ तेरी ये अदा,” अशी कमेंट केली आहे.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात वरुण नार्वेकर यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

-निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना दिसली रिया चक्रवर्ती; नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा