स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे होय. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक बोल्ड लूकमधील फोटो समोर आला आहे.
मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृण्मयीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली आहे. तसेच पायात हाय हील्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती खाली बसून बोल्ड पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress mrunmayee deshpande’s bold photos viral on social media)
तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटोंना नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर सत्यजीत दुबे याने “उफ,” अशी कमेंट केली आहे, तर आणखी काही चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.
मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहित ठरले आहेत. यात ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने झी मराठीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’