Monday, June 23, 2025
Home मराठी ‘तुझे हास्य म्हणजे सर सुखाची’, म्हणत मृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस फोटोवर चाहत्यांच्या लक्षवेधी कमेंट्स

‘तुझे हास्य म्हणजे सर सुखाची’, म्हणत मृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस फोटोवर चाहत्यांच्या लक्षवेधी कमेंट्स

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृण्मयीने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा एक सुंदर शॉर्ट ड्रेस घातला असून, त्यावर तिने पायात हाय हिल्स आणि कानात रिंग्स घातले आहेत. फोटोमध्ये ती खूप सुंदर हसताना दिसत असून, फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress mrunmayee deshpande’s photo viral on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुझे हास्य म्हणजे सर सुखाची श्रावणी,” तसेच इतर चाहते देखील सातत्याने या फोटोवर कमेंट देत आहेत.

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने झी मराठीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा