Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘Views चे तुफान..’ अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या स्पेशल पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावरील मालिका ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या मुक्ताचा चाहतावर्गही चांगलाच मोठा आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारणारी मुक्ता बर्वे सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या आगामी चित्रपटाबद्दल मुक्ता बर्वेने एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वाय या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या  मुक्ता बर्वे आणि  टीम सर्वत्र या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. मुक्ता बर्वे सोबत या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी, सुहास शिरसाट, संदीप पाठक, नागेश भोसले असे अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत.या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरने २ मिलियन व्हिव्यूजचा टप्पा नुकताच पार केला.यासंबंधीची पोस्ट मुक्ताने शेअर केली होती. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन मुक्ता बर्वेने ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने ” ‘वाय’ ट्रेलरला Views चे तुफान…पार केला 2Million Views चा टप्पा ‘वाय’ येतोय २४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला,” असा कॅप्शन दिला आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान अजित वाडीकर दिग्दर्शित वाय हा चित्रपट २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा