Tuesday, April 16, 2024

…म्हणून लतादीदींनी ‘भारतरत्न’ जिंकल्यानंतर साजरा केला नाही आनंद, हृदयनाथ यांचा खुलासा

या आठवड्यात ‘नाम रह जायेगा’चा ग्रँड फिनाले एपिसोड आहे, ज्याद्वारे स्वरकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दिग्गज गायिकेला दिलेली ही सर्वात भावनिक आणि स्टनिंग श्रद्धांजली असेल. या शोच्या आगामी भागात लताजींची बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) दिसणार आहेत. यामध्ये ते लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील आणि प्रवासातील काही किस्स्यांबद्दलही बोलताना दिसणार आहेत.

लता मंगेशकर त्यांच्या कुटुंबाच्या जवळ होत्या आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी त्यांचे प्रेमळ बंध होते. त्याबद्दल बोलताना उषा मंगेशकर म्हणाल्या, “रेकॉर्डिंगच्या वेळी मीना ताई नेहमी लतादीदींसोबत असायच्या. स्टुडिओत रेकॉर्डिंग झाल्यावर लतादीदी मीना ताईंना गाण्याबद्दलचे विचार विचारत असत. मीनांची संमती मिळाल्यावरच त्या गाणे पुढे जाऊ द्यायच्या.” (hridaynath mangeshkar revealed why lata mangeshkar did not celebrate her winning bharatratna)

तसेच त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर म्हणतात, “मला पुरस्कार मिळवावा, हे त्यांचे स्वप्न होते. जेव्हा त्यांनी भारतरत्न जिंकला, तेव्हा त्यांनी ते सेलिब्रेट केले नाही. परंतु जेव्हा मला पद्मश्री मिळाला, तेव्हा त्यांनी तो उत्सवासारखा साजरा केला.

लता मंगेशकर या उत्तम गायिका तर होत्याच, पण समाजासाठी काम करण्यावर त्यांचा विश्वास होता. त्या खूप धर्मादाय कामे करायची. उषा मंगेशकर म्हणाल्या, “लता दीदींनी परोपकारासाठी खूप काम केले आहे. तेही तेव्हा, ज्या काळात त्या फारशा काम करत नव्हत्या. त्यांनी पुण्यात आशियातील सर्वात मोठे आणि परवडणारे रुग्णालय बांधले आहे. बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकारांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचेही त्यांचे स्वप्न होते.”

स्टारप्लसच्या ८ एपिसोड सीरिजमधील ‘नाम रह जायेगा’द्वारे भारतातील १८ लोकप्रिय गायक दिग्गज लता मंगेशकर यांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले आहेत. यात सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या मजुमदार, स्नेहा पंत, प्यारेलाल जी, पलक मुच्छल आणि अन्वेषाच्या नावाचा समावेश आहे. याचा प्रत्येक भाग स्टार प्लसवर दर रविवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होतो. या शोची संकल्पना आणि दिग्दर्शन साईबाबा स्टुडिओचे गजेंद्र सिंग यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा