मराठी सिनेसृष्टीतील लाेकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिचा आज म्हणजेच गुरुवारी (दि. 25 जानेवारी)ला वाढदिवस आहे. पूजाने केवळ मराठी चित्रपटच नाही तर बाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या पूजाने डान्स शाेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली हाेती. यानंतर हळूहळू ती नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपटांकडे वळली. या प्रवासादरम्यान अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.
अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) ही तिच्या अभिनया व्यतिरिक्त फिटनेस आणि फॅशनमुळेही ओळखली जाते. तिने अनेक प्रसिद्ध सिनेमात काम केलं आहे. तिनं तिच्या अभिनयाच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याआधीही अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिनं माझं क्रश सिद्धार्थ मल्होत्रा आहे आणि त्याच्यासोबत मला लग्न करायला आवडेल अशी कबुली दिली होती.
View this post on Instagram
अस असातानाच पूजाचा एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री पूजा आणि भूषण हाततल्या अंगठ्या दाखवताना दिसत आहे. त्यामुळे चाहते असा अंदाज लावला आहेत की, या दोघांनी साखरपूडा केला आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडिया युजर्स कमेंट करत या कलाकरांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
मात्र, मंडळी आम्ही तुम्हाला सांगताे की, हा व्हिडिओ एका जाहिरातीचा भाग आहे. जाे सध्या साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. त्यामुळे या दोघांवर सुरु असणारी ही चर्चा केवल अफवा आहे.(marathi actress pooja sawant and bhushan pradhan secretly engaged the video went viral)
हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर
‘सेल्फी’ रिलीज हाेण्यापूर्वीच अक्षय कुमार साईबाबांच्या चरणी, शिर्डीमध्ये जाऊन अभिनेत्याने घेतलं साई समाधीचं दर्शन