Monday, April 15, 2024

Pooja Sawant Wedding: सप्तपदीपूर्वी पुजा सावंतने समोस्यावर मारला ताव, Video Viral

मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी पुजा सावंत(Pooja Sawant Wedding) अखेर विवाहबंधनात अडकली. पूजाने सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच तिचा एक अनसिन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात पुजाने प्रत्येक नवरीची कथा अप्रत्यक्षपणे शेअर केली आहे.

लग्न म्हटलं घाई गडबड गोंधळ आलाच. या सर्वात प्रत्येक नवरी मुलीचे खाण्यपिण्याचे हाल खुप होत असतात. लग्नाच्या टेन्शनमुळे जेवण जात नाही. सतत भेटायला येणार पाहुणेमंडळी. प्रत्येक विधीदरम्यान बदलत राहणारे आऊटफिट, मेकअप यासर्वात प्रत्येक नवरी मुलीला आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवावे लागते. पण यासर्वाला पुजा सावंत(Pooja Sawant Wedding) अपवाद ठरते.

नुकतंच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये पुजा सावंत (Pooja Sawant Wedding)समोस्यावर ताव मारताना दिसत आहे. कदाचित तिचा हा व्हिडीओ सप्तपदीपूर्वीचा आहे. फ्लिमवाला या इंस्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडीओ शेअर करताना पुजा सावंतने सांगितली प्रत्येक नवरीची कथा अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. अगदी मेहंदी सोहळ्यापासून ते संगीत नाईटपर्यंत प्रत्येक सोहळा पूजा-सिद्धेशने मोठ्या दणक्यात सेलिब्रेट केला. त्यानंतर पूजाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला असून या लग्नसोहळ्यात कुटुंबासह कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

हे देखील वाचा