या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का? लाखो चाहत्यांच्या मनावर गाजवतेय अधिराज्य!

Marathi Actress post her childhood pic on instagram so cute in childhood


मोठे झाल्यानंतर आपण सर्वात जास्त ज्याला मिस करतो, ते म्हणजे बालपण. सर्वांना आपले बालपण खूप प्रिय असते. अशामध्ये जेव्हा बालपणीचे फोटो समोर येतात, तेव्हा त्या जुन्या गोड आठवणींमध्ये मन अगदी रमून जातं. सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ- मोठ्या कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणी जपताना दिसतो आणि काही खासप्रसंगी त्या आठवणींना उजाळा दिला जातो. असाच आपल्या बालपणीचा एक फोटो, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला आहे. ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत होय.

पूजा सावंत तिच्या लूक्सने नेहमी सोशल मीडियावरील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फाॅलोविंगही तगडी आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या पूजाचा हा गोंडस फोटो आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

काही दिवसांपूर्वी पूजाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा बालपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये पूजा तिच्या पालकांसोबत दिसली आहे. फोटो शेअर करत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “वेळ किती वेगाने निघून जाते, मला पुन्हा लहान व्हायचंय!” हाॅट पूजाचा हा गोंडस फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१५ साली आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली. यांनतर २०१८ साली ‘लपाछपी’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी, पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटाचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली. यात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.