उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले. आलेल्या प्रत्येक भूमिकेला ती न्याय देते. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. अशातच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. यासोबत तिने गळ्यात सुंदर असा मोत्याचा नेकलेस आणि यावर मॅचिंग इअरींग, कपाळावर छोटीशी लाल रंगाची टिकली, नाकात नथ घातली. केसांची सुंदर हेअर स्टाईल करून केसात गजरा माळला आहे. फोटोमध्ये प्राजक्ता अगदी सौंदर्यवती दिसत आहे. (marathi actress prajakta mali share her photos on social media)
प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठ्या संख्येने चाहते आहेत. तिचा कोणताही फोटो शेअर होताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो. तिच्या या फोटोला देखील मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तिच्या एक चाहत्याने या फोटोवर “वा ताई वा” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “आमची गुळाची ढेप” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तिचा हा ड्रेस आणि मेकअप खूप आवडला आहे.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी