Friday, July 5, 2024

Viral Video:अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड रंगली विठुनामाच्या गजरात, वारकऱ्यांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेली आषाढी वारी सध्या राज्यात मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे. लाखो वारकऱ्यांची गर्दी आणि विठुनामाच्या गजरात भक्तीमय वातावरणात  तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच पुणे शहरात आगमन झाले. यावेळी अनेक मराठी कलाकारही वारीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचाही असाच वारकऱ्यांच्या गर्दीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला (Prajkta Gaikwad) प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. प्राजक्ताने मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारली होती.सहजसुंदर अभिनय आणि सोज्वळ सौंदर्यामुळे प्राजक्ताने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते ज्यावरुन ती अनेक फोटो आणि  व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. सध्या प्राजक्ताची वारी स्पेशल पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यावर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर केली आहे. ज्यामध्ये प्राजक्ता नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेत वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या भक्तीत लीन झालेली दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने टाळ मृदूंगाच्या गजरात ठेका धरल्याचेही दिसत आहे. प्राजक्ताच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रिया देत प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

 

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने “ही एकच अभिनेत्री आहे जिचा अभिमान वाटतो,” असे लिहले आहे तर दुसऱ्या एका चाहत्याने “रखुमाई सारखे दिसता” असे म्हणत प्राजक्ताच्या या लूकचे कौतुक केले आहे. या पोस्टसोबत प्राजक्ताने  वारीच्या वाटेवर असा सुंदर कॅप्शन दिला आहे. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेबरोबरच नांदा सौख्यभरे तसेच संत तुकाराम मालिकेतही काम केले आहे.

हे देखील वाचा