‘आम्ही सगळे खोटे-खोटे हिरो असतो…’ अभिनेते मिलिंद गवळींच्या ‘त्या’ स्पेशल पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या घराघरात लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. यामध्ये सर्वात जास्त होते ती अनिरुद्ध आणि अरुंधतीची. मालिकेत दोघांच्याही जोडीचे प्रेक्षक भरभरुन कौतुक करताना दिसत असतात. सध्या अनिरुद्ध म्हणजेच मिलींद गवळी (Milind Gawali) या मालिकेमुळे नव्हेतर त्यांच्या एका व्हायरल पोस्टमुळे सर्वत्र चर्चेत आले आहेत. काय आहे ही व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ. 

मिलींद गवळी हे त्यांच्या कसदार अभिनयासाठी सर्वत्र ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयामुळे ते नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतात. मिलींद गवळींनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या या इंस्टाग्राम पोस्टवर अनेक चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “स्वप्नांच्या दुनियाच माझं स्वप्न  1975 मध्ये 15 ऑगस्ट ला “शोले” नावाचा पिक्चर रिलीज झाला .मिनर्व्हा थिएटरमध्ये तुडुंब गर्दी , त्या काळामध्ये ब्लॅक मद्धे तिकीट विकली जायची . शोले चे तिकीट मिळवून आणि तो सिनेमा मिनर्वा मध्येच बघायचंय , हे पण माझं स्वप्न होतं , जे काही आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी ते पूर्ण केलं. असंख्य सिनेमे बघितले,सिनेमाशी निगडीत अशी असंख्य स्वप्न ही मी बघितली, (खरतर अजूनही बघतोच आहे )
मी शाळेतच एक स्वप्न बघितलं होतं ,आपण सिनेमामध्ये काम करायचं. दोन-तीन वर्षात “हम बच्चे हिंदुस्तान के” या चित्रपटात काम केले आणि ते ही स्वप्न पूर्ण झालं, त्यानंतर असंख्य सिनेमांमध्ये मी कामं केली , मग मी स्वप्न बघितलं , आपला स्वतःचा एक सिनेमा असावा ,आपण तो बनवावा आणि “अथांग” नावाचा सिनेमा मी केला , त्यामुळे स्वप्न बघावीत, छोटी बघावित, मोठी बघावीत आणि थोडा वेळ द्यावा ,मग ती नक्कीच पूर्ण होतात.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

 

दरम्यान अभिनेते मिलींद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यावर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियाचा पाऊस पाडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post