Friday, July 5, 2024

अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया

प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे मुख्य भूमिकेत असणारी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. ही मालिका सुरू होऊन केवळ दोन आठवडे झाले आहेत. परंतु आख्ख्या महाराष्ट्राने या मालिकेला डोक्यावर घेतले आहे. मालिकेतील पात्र, शीर्षक गीत, डायलॉग प्रेक्षकांना खूप आवडत आहे. लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकजण आवडीने ही मालिका पाहतात. प्रार्थना आणि श्रेयस यांच्यासोबत मालिकेतील आणखी एक पात्र चांगलेच भाव खाऊन जात आहे. ते पात्र म्हणजे मालिकेतील छोटी परी, मायरा वैकुळ होय. श्रेयस आणि प्रार्थना यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त मायराला लोकप्रियता मिळत आहे. अशातच मालिकेच्या सेटवरून मायरा आणि प्रार्थनाचा एक धमाल व्हिडिओ समोर आला आहे.

प्रार्थनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि मायराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची मस्ती पाहायला मिळत आहे. त्या दोघींचे तोंड वेडे-वाकडे झालेले दिसत आहे. खरं तर, त्या दोघींनी तसा इंस्टाग्राम फिल्टर लावला आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Marathi actress prarthana behere and myra vaikul’s funny video viral on social media)

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहेत. तसेच अनेकजण हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

प्रार्थना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक झलक बघण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झालेले असतात. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिने अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा