Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

हिरवी साडी नेसूनी, कपाळी लावली चंद्रकोर! पाहा अभिनेत्री प्रार्थना बेहेरचे खास फोटो

‘पवित्र रिश्ता’ या हिंदी टीव्ही मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. त्यात तिने ‘वैशाली’ची भूमिका साकारली होती. तिने तिच्या उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमाने तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. सतत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांना तिच्याशी संबंधित अपडेट देत असते.

नुकतेच, प्रार्थना बेहेरेने इंस्टाग्राम तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये चाहत्यांना तिचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, प्रार्थनाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिने केस कुरळे करून मोकळे सोडले आहेत. तसेच, तिने गळ्यामध्ये एक जाड सोन्याची बोरमाळही घातली आहे. याशिवाय, कपाळावर लावलेली चंद्रकोर तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.

फोटो शेअर करत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये निळे हार्ट पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या या दोन फोटोंना चाहत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. फोटोला काही तासांतच 40 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. तर चाहत्यांनी फोटोवर लाल हार्टचे इमोजी पोस्ट करून त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.

खरं तर तिने हे फोटो एका ज्वेलरी ब्रँडची ब्रँडिंग करत शेअर केले आहेत. गळ्यात घातलेल्या दागिन्याची तिने जाहिरात केली आहे. हायनेस फॅशन ज्वेलरी (highness fashion jewellery) असे या ब्रँडचे नाव आहे. इतकेच नव्हे तर याआधीही तिने ब्रँडसाठी जाहिरात करत बरेच मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

याव्यतिरिक्त, काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्त प्रार्थनाने काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, कुटुंबासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांची कथा सांगितली होती. तसेच कष्ट करून घर चालविणाऱ्या महिलांना तिने सलामही केला होता. या फोटोंमुळे प्रार्थना बरीच चर्चेत होती आणि यासाठी तिचे खूप कौतुकही झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वतंत्र आयुष्यासोबत जबाबदारीची जाणीव करून देत ‘धक धक गर्ल’ माधुरीने मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाली…

-बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

हे देखील वाचा