Tuesday, October 14, 2025
Home कॅलेंडर प्रार्थना बेहेरेच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, फोटो पाहून चाहते घायाळ!

प्रार्थना बेहेरेच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, फोटो पाहून चाहते घायाळ!

प्रार्थना बेहेरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील ओळखीचे नाव. प्रार्थना ही नेहमीच तिच्या फॅन्स साठी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिच्याशी निगडित अनेक गोष्टी ती नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेयर करते. यावेळेस देखील प्रार्थनाने तिच्या नवीन फोटो शूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी आणि सौंदर्यने घायाळ करणारी प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावरून फॅन्ससोबत जोडलेली असते. प्रार्थना नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकतेच तिने तिच्या ब्लॅक ड्रेस मधील निवडक फोटो तिच्या अकाऊंटवरून शेयर केले आहेत. तिच्या या फोटोंनी  सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही वेळातच तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल झाले.

समुद्र किनारी काळ्या रंगांच्या लॉन्ग वन पीस मध्ये प्रार्थना अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. कलरफुल आणि ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन प्रकारचे फोटो तिने पोस्ट केले आहे. तिच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करत अनेक कंमेंट्स केल्या आहेत. प्रार्थना नेहमी तिच्या लूक्सची काळजी घेत असते. प्रार्थना तिच्या फिटनेसची आणि आरोग्यासाठी नेहमी सजग असते. यासंबंधीत प्रार्थना अनेक टिप्स आणि व्हिडिओ शेयर करत असते.

प्रार्थनाने तिच्या करियरची सुरुवात ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून केली होती. तिने ‘क्राईम पेट्रोल’ मध्ये देखील काम केले आहेत. त्यानंतर तीने ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या सिनेमातून मराठी चित्रपटात एन्ट्री घेतली. 9X झकासच्या हिरोइन नंबर १ या टॅलेंट शो मध्ये सहभाग घेत हा शो जिंकला. त्यानंतर तिने स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत ‘मितवा’ या सुपरहिट चित्रपटात काम केले. मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या अभिनयाने तिने तिचे वेगळे स्थान निर्माण केले. प्रार्थना तिच्या हसण्याच्या हटके स्टाईल मुळे सुद्धा प्रसिद्ध आहे.
प्रार्थना लवकरच ‘छूमंतर’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडनमध्ये चालू आहे.

हे देखील वाचा