Friday, July 5, 2024

आहा…किती ते देखणं रूप! प्रार्थना बेहेरेचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल

‘नेहा’ बनून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे होय. प्रार्थना सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. चित्रपटसृष्टीनंतर टेलिव्हिजनवर देखील तिचे कौतुक होत आहे. मालिकेतील तिची साधी भोळी आणि समंजस भूमिका प्रेक्षकांना खूप भावत आहे. मालिकेत तिच्यासोबत अभिनेता श्रेयश तळपदे मुख्य भूमिकेत दिसत आहे. अभिनयासोबत ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटना ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिचा एक सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची सुंदर पैठणी नेसली आहे. यावर तिने निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तिने नाकात नथ, कपाळी चंद्राची कोर, गळ्यात चोकर असा साजशृंगार केला आहे. सोबत तिच्या गोड हास्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे. तिचा हा लूक ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील कलाकार येत्या आठवड्यात बाप्पाची आराधना करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ च्या येणार आहेत. हा फोटो शेअर करून तिने “बाप्पा मोरया,” असे कॅप्शन दिले आहे.

प्रार्थना ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची नायिका आहे. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतो. (marathi actress prarthna behere share her saree look photo on social media)

प्रार्थना बेहेरेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत तिने अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. या पात्राने ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिच्या करिअरला असे काही वळण मिळाले की, केवळ ‘मितवा’ या एका चित्रपटाने तिला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली.

‘मितवा’ या चित्रपटासाठी प्रार्थना नाईन ‘एक्स झकास हिरोइन’ या शोची विजेती स्पर्धक झाली होती. यानंतर तिने ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘फुगे’ या चित्रपटात काम केले. ती सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा