Sunday, August 3, 2025
Home कॅलेंडर दुर्दैव ते! कलाकारांनी पुन्हा दाखवली असंवेदनशीलता, प्रेमा किरण यांच्या अंत्य दर्शनाला केवळ ४-५ कलाकार उपस्थित

दुर्दैव ते! कलाकारांनी पुन्हा दाखवली असंवेदनशीलता, प्रेमा किरण यांच्या अंत्य दर्शनाला केवळ ४-५ कलाकार उपस्थित

मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांच्या निधनाने संपूर्ण सिने जगताला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे १ मे २०२२ रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायिका म्हणून उत्तम काम केले. त्या मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही झळकल्या होत्या. ‘धूम धडाका’ (१९८५), ‘पागलपण’ (२००१), ‘अर्जुन देवा’ (२००१), ‘कुंकू झाले वैरी’ (२००५) आणि ‘लग्नाची वरात’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून प्रेमा किरणने नेहमीच आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकली. मात्र प्रेमा किरण यांच्या अंतिम दर्शनासाठी मराठी कलाकार फिरकलेही नाहीत. यावेळी केवळ ४-५ कलाकार उपस्थित होते.

इंडस्ट्रीतील एका ज्येष्ठ अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, “मराठी चित्रपटात ४० वर्षे काम करत लोकांचे मनोरंजन करणाऱ्या प्रेमा किरण यांच्या अंत्य दर्शनासाठी फक्त ४ कलाकार उपस्थित होते. कदाचित माणुसकी अजूनही जिवंत असेल.” प्रेमा किरण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम, महेश टिळेकर यांच्यासह विजय पाटकर, उमेश ठाकूर आणि दीपक कदम यांची नावे होती.

ज्येष्ठ कलाकारांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सेलिब्रिटी न पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्वीट करून नव्या पिढीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आजच्या नव्या पिढीला मोठ्यांचा आदर कसा करावा हेच कळत नाही. या नव्या स्टार्सना लाज वाटली पाहिजे, विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या नव्या कलाकारांपैकी एकही कलाकार आला नाही. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी जाहीर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा