सध्याच्या घडीला सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत जवळपास सर्वजण सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय काय केले, यांसारख्या अनेक गोष्टी ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना दिसतात. त्यातल्या त्यात आघाडीच्या अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांच्या पोस्टवर इतर कलाकारही कमेंट करताना दिसतात, जे काही चाहत्यांना आवडते, तर काहींना आवडत नाही. असेच काहीसे मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरातसोबत झाले.
झाले असे की, अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून आपला केरळमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांसोबतच अभिनेत्री राजेश्वरीनेही कमेंट केली. तिने सनीच्या फोटोवर कमेंट करत ‘क्यूट’ असे लिहिले होते. परंतु राजेश्वरीची ही कमेंट तिच्या एका चाहत्याला आवडली नाही. आपली राजश्वरी फेव्हरेट असताना तिचे दुसरे कुणी फेव्हरेट असलेले कदाचित त्या चाहत्याला आवडले नसावे.
https://www.facebook.com/sunnyleone/photos/a.133359646872189/1690070287867776/
त्या युजरने राजेश्वरीच्या फेसबुकवरील एका फोटोवर वाईट कमेंट करत लिहिले की, ‘हे काय शालू आम्ही तुपले फॅन अन् तू हीची (सनीची)..बाबव लै बेकार हाय ती… तिचे वेडियो पाठऊ का तुले?’
यावर राजेश्वरी खडेबोल सुनावत म्हणाली, ‘पहिले तुमच्या आई- बाबांसोबत पाहा. त्यांना आवडले तर मलाही पाठवा.’

यानंतर त्या युजरने ती कमेंट डिलीट केली परंतू राजेश्वरीने पुन्हा त्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, ‘काकांनी कमेंट डिलीट केली बहुतेक.’ यासोबतच तिने #भित्रे_काका असेही लिहिले.
यापूर्वीही राजेश्वरीने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या फोटोंवर कमेंट केली आहे. यावरही काही युजर्सनी आक्षेप घेतला होता. परंतु युजरच्या कमेंटला न घाबरता राजेश्वरीनेही आपल्या स्टाईलमध्ये खडेबोल सुनावले.
सध्या राजेश्वरी आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत आहे. नुकतेच तिने आपल्या आजोबांच्या शेतातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला होता. त्यात तिने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स घातली होती.
राजेश्वरीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने सन २०१३ मध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यात तिने ‘शालू’ नावाचे पात्र साकारले होते. यामध्ये तिच्या वाटेला फार कमी डायलॉग्ज आले. पण तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले. तिचे हे पात्र चांगलेच गाजले. त्यानंतर तिने सन २०१७ मध्ये ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी भरत जाधवने लढवली अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’










