Saturday, July 6, 2024

‘तुमच्या कल्पनेतील आयुष्य जगा’, म्हणत ‘फॅन्ड्री’ मधील शालूने शेअर केला तिचा ग्लॅमरस लूक

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. २०१३ साली नागराज मंजुळे एक वेगळी कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर आले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘फॅन्ड्री.’ या चित्रपटाला खास करून ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता.

या चित्रपटाच्या कहाणीसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री देखील चांगलीच लोकप्रिय झाली. ती अभिनेत्री सगळ्यांची लाडकी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात. राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या पारंपरिक लूकपासून ते अगदी हॉट आणि बोल्ड लूकचे ती तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते. अशातच तिने तिचा एक ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Marathi actress Rajeshwari kharat share her glamorous photos on social media)

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, राजेश्वरीने सुंदर असा लाल रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. तसेच कानात मोठे रिंग्स घातले आहेत. आणि कर्ली हेअर करून तिचा हा लूक पूर्ण केला आहे. फोटोमध्ये तिला पाहून तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही की, ही ‘फॅन्ड्री’मधील शालू आहे.

हा सुंदर फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमच्या कल्पनेतील आयुष्य जगा.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने “लाल मिर्ची” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने “लाल परी” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच तिची ‘रेडलाईट’ ही शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली आहे. यामधून तिने समाजातील वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे थरारक आयुष्य दाखवले आहे. समाजाचा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. यातील राजेश्वरी खरातचा अभिनय पाहून नक्कीच तुमच्या भुवया उंचावतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा