Saturday, July 6, 2024

‘छोटी प्रिया बापट’ अशी ओळख मिळवणाऱ्या राजेश्वरी खरातचा बोल्ड डान्स आणि कातिल अदा करताय सर्वांना घायाळ

सोशल मीडिया हे आता अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ झाले आहे. प्रत्येकजण आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. यात अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडिया युजर्सपैकी एक आघाडीची युजर आहे. दररोज न चुकता ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राजेश्वरीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सध्या इंस्टाग्रामवर ट्रेडिंग असणाऱ्या ‘टच इट’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत असून तिने लाल रंगाचा बोल्ड ड्रेस घातला आहे. तिने केसांची पोनीटेल घातली आहे. तसेच तिचा मेकअप देखील तिच्या या लूकला साजेसा आहे. ( Actress Rajeshwari kharat’s video viral on social media)

 

तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. ते सातत्याने तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर “जीव घेणार काय आता?” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मला प्रिया बापट दिसत आहे तुझ्यामध्ये.” तर आणखी एका चाहत्याने “छोटी प्रिया बापट” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा