Wednesday, July 3, 2024

‘मोठं घर पोकळवासा अन वारा भसाभसा’, काय मंडळी ओळखलंत का ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला

सध्या चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपले बालपणीचे फोटो शेअर करताना दिसत असतात. आत्ताच्या ग्लॅमरस आणि दमदार कलाकारांकडे बघताना त्यांच्या बालपणीचे फोटो पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटत असते. कधीकधी तर या कलाकारांना बालपणीच्या फोटोत ओळखणेसुद्धा कठीण जाते. असाच काहीसा प्रकार एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीसोबत घडला आहे. या अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. मात्र हा फोटो पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.

सध्या सोशल मीडियावर मराठी चित्रपट क्षेत्रातील एका आघाडीच्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना ही ओळखणे कठीण झाले आहे. हा फोटो आहे अभिनेता मकरंद अनासपूरे सोबत गाढवाचं लग्न चित्रपटात काम केलेल्या गंगीचा म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगेचा. राजश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CaPOdustINn/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत गाडीचे स्टेअरिंग हातात पकडून बसलेली राजश्री खूपच सुंदर दिसत आहे. फोटोसोबत राजश्रीने “एवढी ओढ लाखो करोडो रूपये पाहून होत नाही, जितकी लहानपणीचा फोटो पाहिल्याने होते” असा सुंदर कॅप्शन दिला आहे.राजश्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर प्रेक्षकांच्या सुंदर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान अभिनेत्री राजश्री लांडगे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यावरून ती आपल्या चाहत्यांशी नवनवीन फोटो शेअर करत असते. राजश्रीने आपल्या अभिनयाची सुरूवात नाटकांपासून केली होती. गाढवाचे लग्न चित्रपटातील तिने साकारलेली गंगीची भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटानेच तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. राजश्रीने सिटीझन या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला प्रारंभ केली होता.

हे देखील वाचा