निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं ऋतुजा बागवेचे रुप, कलाकारांनीही केला कौतुकाचा वर्षाव

Marathi actress Rutuja bagwe share her saree look photos on social media


मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत सालस आणि सोज्वळ भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. प्रेक्षकांनी देखील तिच्या अभिनयाला दाद दिली आहे. आज तिने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती अनेकवेळा शेअर करत असते. तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत.‌ या फोटोमध्ये ऋतुजा नेहमी प्रमाणेच खूप सुंदर आणि सालस दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋतुजाने डार्क निळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसलेली आहे. यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. कपाळी मोठी निळ्या रंगाची टिकली लावली आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत. (Marathi actress Rutuja bagwe share her saree look photos on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर अश्विनी केसर, अन्विता फलटणकर, माधवी निमकर, भाग्यश्री लिमये या कलाकारांनी कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.