Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

टीव्हीवर सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘टॉपलेस’ बोल्ड अवतार पाहून चाहतेही चक्रावले!

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे खासकरून तिच्या सोज्वळ भूमिकांसाठी ओळखली जाते. ती सतत तिचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करत राहते. या सुंदर फोटोंमुळे ऋतुजा बऱ्याचवेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय देखील बनते. सध्याही या अभिनेत्रीची खूप चर्चा चालू आहे. मात्र यावेळेस ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. होय, नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये ऋतुजा बागवेचा अत्यंत बोल्ड अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला, ज्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा चालू आहे.

ऋतुजा बागवेने अलीकडेच, तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती बेडवर बसलेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे तिने कपडे न घालता, केवळ एक ब्लँकेट तिच्या भोवती गुंडाळली आहे. या बाबीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आता ऋतुजाच्या या पोस्टवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांशिवाय, मराठी कलाकारही तिच्या या बोल्ड लूकवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. टीव्हीवर साधीभोळी दिसणारी ऋतुजा आता बऱ्यापैकी बोल्ड झालेली दिसतेय. चाहत्यांनाही तिचा हा नवा अंदाज आवडल्याचे दिसून येत आहे.

ऋतुजाने तिचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय व रायगड मिलिटरी स्कूलमधून केले. तर बी.एस्सी. गणिताचे शिक्षण तिने महर्षी दयानंद विद्यालयामधून पूर्ण केले आहे.

सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता अभिनेत्री ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मोनालिसाचे बिना मेकअप फोटो, साडीवर दिसतेय सौंदर्याची खाण

-दोन दिवसांतच भोजपुरी गाण्याने रचलाय युट्यूबवर विक्रम, राकेश मिश्राच्या गाण्याला चाहत्यांच्या मिळतायत जोरदार हिट्स

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

हे देखील वाचा