Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

कोरोना व्हायरसने जवळपास सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याचे दिसत आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. या काळात प्रदर्शित होणारे अनेक चित्रपटांना आपली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. परंतु ‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सलमानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (२२ एप्रिल) ११ वाजता रिलीझ झाला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये भलताच आनंद दिसत आहे.

सलमान खानने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या ट्रेलरबद्दल लिहिले आहे.

सलमानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आला आहे. रिलीझ करताच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत असल्याचे दिसत आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे.

शोधला चित्रपट प्रदर्शित करण्याचा नवा मार्ग
खरं तर हा चित्रपट मागच्या वर्षी रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे मागच्या वर्षी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता या वेळेस हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला आहे. ‘राधे’ हा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे ओटीटी अधिकार झी ५ कडे आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट कुठे प्रदर्शित होईल, याची सगळेजण वाट बघत होते. परंतु हा चित्रपट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

१३ मे ला होणार सर्वत्र प्रदर्शित
प्रभूदेवाने दिग्दर्शन केलेल्या राधे चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटाणी हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, पण त्याचे स्वरूप वेगळे असणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ‘पे पर व्ह्यू’ नुसार पाहता येणार आहे. म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघायला प्रेक्षकांना पैसे द्यावे लागणार आहेत. सोबतच देश- विदेशात जिथे कुठे चित्रपटगृह खुली आहेत, तिथे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. राधे हा चित्रपट 13 मे ला सर्वत्र प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट

-‘भाईजान’ सलमान खानच्या बहुचर्चित ‘राधे…’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, चित्रपटगृहांसह ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीझ

-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!

-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा