Tuesday, July 9, 2024

आहा कडचक ना! सई ताम्हणकरचे गुलाबी रंगाच्या स्टायलिश लूकमधील फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर होय. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि अनोख्या अंदाजामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

सईने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट साईड कट ड्रेस घातला आहे. तसेच या ड्रेसला फिकट गुलाबी रंगाचे बलून स्लीव्ह्स आहेत. त्यामुळे या ड्रेसला आणखीनच शायनी लूक आला आहे. या ड्रेसवर तिने पायात चंदेरी रंगाचे हाय हील्स घातले आहेत आणि केसांची पोनीटेल घातली आहे. तसेच ड्रेसला साजेसा असा मेकअप केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. (Marathi actress sai Tamhankar share her glamorous photos on social)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मैं भी गुलाबी, तू भी गुलाबी, दिन भी गुलाबी, है गुलाबी ये केहर.” तिचा हा स्टायलिश लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेता स्वप्नील जोशी याने “विंग्ज,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. सोबतत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली.

तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंद गगनात माझा मावेना! ‘या’ कारणामुळं भलतीच खुश झालीय सई ताम्हणकर

-‘तुला माणसांची किंमत नाहीये’, सोनाली आणि विशालमध्ये पेटला वाद, येणार का दुरावा?

-लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने ५ वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास

हे देखील वाचा