लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने ५ वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास

मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला ओळखतात. तो अभिनेता इतर कुणी नसून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थातच सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने लाखो चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. अशातच सिद्धू शनिवारी (२३ ऑक्टोबर) त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास.

सिद्धार्थचा जन्म २३ ऑक्टोबर, १९८१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र जाधव, तर आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. त्याच्या बहिणीचे नाव पंकजा जाधव आहे. जन्म जरी रत्नागिरीमध्ये झाला असला, तरी सिद्धार्थचे संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झाले आहे. त्याचे शेवरी म्युनिसिपल स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाले, तर रुपारेल महाविद्यालयमधून त्याने त्याची पदवी संपादन केली आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये सिद्धार्थच्या घरची आर्थिक परिस्थिती देखील फार चांगली नव्हती. (Siddharth Jadhav celebrate his birthday, let’s know about his life)

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

कॉलेजमध्ये असल्यापासून सिद्धार्थला अभिनयाची खूप आवड होती. त्याने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकात तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्याची ही आवड जपली आहे. त्याने २००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. तसेच त्याच्यातील विनोदी वृत्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सुरुवातीला त्याला त्याच्या रंगामुळे अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु त्याने त्याच्या कर्तुत्वावर त्याचे दिसणे आणि रंग त्याची ओळख बनवली.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

यानंतर त्याला अनेक सुपरहिट चित्रपटातून ऑफर येऊ लागल्या. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने अशी काही कमाल केली की, त्याने यानंतर प्रत्येक वर्षी दोन ते तीन चित्रपटात काम केले आहे. त्याने २००६ साली ‘जत्रा’, ‘चांगभलं’, ‘माझा नवरा तुझी बायको’ या चित्रपटात सर्वोत्कृष्ट भूमिका निभावली. या एकाच वर्षात त्याचे नाव इतके गाजले की, याच वर्षी त्याला बॉलिवूडमधून देखील ऑफर आणि त्याने २००६ साली ‘गोलमाल फन अनलिमिटेड’ या हिंदी चित्रपटात काम केले.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

यानंतर त्याने ‘यांचा काही नेम नाही’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जबरदस्त’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘इरादा पक्का’, ‘टारगेट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘खो-खो’, ‘ढोलकी’, ‘माऊली’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्याने ‘राधे’, ‘सिंबा’, ‘पावडर’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘आउटसोर्स’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थने अनेक नाटकात देखील काम केले आहे. त्याने ‘लोचा झाला रे’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘गेला उडत’ या नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्याने टेलिव्हिजनवर देखील काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तो सध्या एक आघाडीचा आणि लोकप्रिय अभिनेता आहे. प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल एक अढळ स्थान आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याने तृप्ती अक्कलवार हिच्याशी २००७ मध्ये लग्न केले होते. तृप्ती आणि सिद्धार्थचा प्रेमविवाह झाला आहे. तृप्ती पत्रकार आहे. त्यांची भेट एका नाटकाच्या संदर्भात झाली होती. तेव्हाच सिद्धार्थला ती खूप आवडली होती. तो दररोज तिच्यासाठी बस स्टँडवर जात असायचा.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

त्यानंतर एके दिवशी त्याने तृप्तीला प्रपोज केले. परंतु त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी तिने त्याला होकार दिला होता. तोपर्यंत तो तिची वाट बघत होता.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

तृप्ती आणि सिद्धार्थला दोन मुली आहेत. एकीचे नाव इरा, तर दुसरीचे नाव स्वरा असे आहे. २०१७ मध्ये त्या दोघांनी स्टार प्लसवरील ‘नच बलिये ८’ या शोमध्ये भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अल्पावधीतच यश मिळवलेल्या झायराने अचानक ठोकला इंडस्ट्रीला ‘राम राम’, ‘या’मुळे यायच्या तिला जीवे मारण्याच्या धमक्या

-फिटनेसमध्ये तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देते ४८ वर्षांची मलायका, ‘आयटम नंबर’ करून मिळवलीय तिने प्रेक्षकांची वाहवा

-आनंद गगनात माझा मावेना! ‘या’ कारणामुळं भलतीच खुश झालीय सई ताम्हणकर

Latest Post