Saturday, July 6, 2024

‘उफ्फ तुझी अदा…!’ संस्कृती बालगुडेकडून फोटो शेअर, केसात माळलेल्या गजऱ्याने चोरली लाखो मने

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. अशातच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

संस्कृतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने खूप सुंदर ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. यावर तिने हार घातला आहे. तसेच कानात ईअरिंग घातले आहेत. केसांचा अंबाडा घालून केसांमध्ये फुले घातली आहेत. तिने नाकात नथ घातलेली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती तिच्या ड्रेससोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sanskruti balgude share her photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले.” तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर ‘काळीज’ अशी कमेंट केली आहे. तर काही चाहत्यांना तिचे हास्य खूप आवडले आहे.

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप

‘त्याच्याबरोबर’ प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतच गोड फोटो, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो

हे देखील वाचा