छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते. अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते. मात्र, काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.
सायलीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता घातलेला आहे. तसेच लाल रंगाची ओढणी घातली आहे. कानात झुमके घातले आहेत. कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहेत. तसेच तिने पायात कोल्हापुरी चप्पल घातली आहे. यामधील एक खास गोष्ट म्हणजे तिने एका पायात मोजा घातला आहे. त्यामुळे तिच्या या पायातील मोजाची वेगळीच चर्चा रंगली आहे. (Marathi actress sayali sanjeev’s photo viral on social media)
तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुला रोज जरी पाहिलं, तरी तुला पाहणं उरतंच बाकी. पाहून तुला रोज नव्यानं, तुझ्या प्रेमात रोज पडावं. प्रेम वेडा मी तुझ्यापरी.” त्याने एकप्रकारे सायलीसाठी कविता सादर केली आहे.
सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले.
तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायली सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’